

नागपूर (Nagpur):- तीन जून हा विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आहे सर्वसामान्य व्यक्तीसाठी स्वस्त आणि मस्त असा हा वाहन पर्याय आहे. आजचे या धकाधकीच्या जीवनामध्ये सायकल चालवणे ही आवश्यक बाब झाली आहे. आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी सायकल चालवण्याचा संकल्प केला पाहिजे. जेणेकरून आरोग्य सुदृढ व निरोगी राहील. आज तीन जून सर्व जगात जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने घेतलेला आढावा.
सायकलींग मुळे स्नायू मजबूत होतात, रक्तभिसरण वेगात चालते हृदय शरीराला रक्तपुरवठा व्यवस्थित करतो, मधुमेह, ब्लड प्रेशर सारखे आजार सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. म्हणून सायकल चालवणे आवश्यक आहे. नियमित सायकल चालव ल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पायाचे स्नायू बळकट होतात, तसेच शरीराचा समतोल साधला जातो, शरीराची कार्यक्षमता सुधारते, सायकलींग मुळे साध्यावर कमी ताण पडतो त्यामुळे प्रत्येक गटातील व्यक्तीसाठी सायकल चालविणे हा उपयुक्त व्यायाम प्रकार ठरतो. त्यामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य ही सुधारते तणाव मुक्त जीवन जगण्यास सहकार्य करते, नैराश्य, चिंता कमी होण्यास मदत करते, मन प्रसन्न राहते, शरीरात ऊर्जा निर्माण होते.असे कितीतरी फायदे सायकलींग होते. म्हणून बालक, तरुण, वृद्ध या सर्व गटातील व्यक्तींनी सायकल चालवणे आवश्यक आहे. भंडारा शहरातील एक सामाजिक संघटना ओबीसी क्रांती मोर्चा या संघटनेचे कर्तव्यदक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी मते साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिकांनी सायकलिंग ग्रुप तयार करून भंडाराच्या परिसरातील खेड्यापर्यंत सायकलिंग करून आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील आठ ते नऊ वृत्त व्यक्ती जागतिक सायकली दिनानिमित्त जवळच असलेल्या कोरंबी देवस्थानला भेट देऊन निरोगी आयुष्याची कामना व्यक्त केली आहे.
जागतिक सायकल दिनाचे महत्त्व :- समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात सायकल हे वाहन सहिष्णुता मानवता यांचे प्रतीक आहे असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो आरोग्यदायी जीवन शैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे असा संदेश या निमित्ताने दिला जातो यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. इतिहास:- सायकल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील मोंट गोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझॅक सिबिल्सकी यांनी याचिकेच्या स्वरूपात दिला होता 1990 च्या काळात सायकल चालवण्या साठी अनेकांनी प्रोत्साहन दिले परंतु हळूहळू या दिनाचे महत्त्व कमी होत गेले त्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने या दिनाचे महत्त्व जपण्यासाठी 3 जून 2018 रोजी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेला. त्या दिवसापासून हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
सायकल चालवण्याचे फायदे :- सायकल चालवल्याने वातावरणात प्रदूषण होत नाही किमान अर्धा तास सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहते. तसेच वजन कमी करता येते सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहून पचनक्रिया सुधारते दररोज सायक्लिन केल्याने मेंदू पंधरा ते वीस टक्के सक्रिय राहतो तसेच हृदय आणि फुफ्फुस मजबूत राहतात आणि आजार आपल्यापासून दूर राहते. यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते सेवानिवृत्त प्राध्यापक विद्यानंद भगतसर प्रसिद्ध ज्वेलर्स प्रतीन फाये यशवंतजी गायधने गोविंदराव रेहपाडे ओम प्रकाश मोहोबंशी श्रीराम मेहर आदी उपस्थित होते

















