चक्रीवादळाने मान्सूनची आगेकूच थांबली, विलंब होणार

0

नवी दिल्ली- केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबले आहे. चद्रीवादळामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडील वाऱ्यासह केरळच्या दिशेने संथ गतीने सरकणारे ढग चक्रीवादळाच्या दिशेने खेचले गेले. रविवारी केरळजवळ दिसलेले ढग आता चक्रीवादळाच्या दिशेने अधिक घनतेने एकत्र येत आहेत आणि केरळच्या दिशेने कमी झाले आहेत. त्यामुळे मान्सूनचे आगमन लांबल्याचे मानले जात आहे. केरळच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद होत आहे. परंतु दक्षिण अरबी समुद्रातील पश्चिमेचे वारे समुद्रसपाटीपासून सुमारे २.१ किमी उंचीपर्यंत वाहत आहेत, तर मान्सून सुरू होण्यासाठी ते ४.६ किमीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर वारे कमकुवत होत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येत्या २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतर ते आणखी मजबूत होत उत्तरेकडे सरकू शकते, असा अंदाज आहे. मागील ४ दिवसांपासून मान्सून एकाच ठिकाणी थांबला आहे. तो आणखी दोन-तीन दिवस तिथेच अडकून राहू शकतो, असा अंदाज आहे.