हरियाणा : झज्जरमध्ये भूकंपाचे धक्के

0

चंदीगड, 06 जून  : हरियाणाच्या झज्जरमध्ये आज, मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.5 इतकी होती. पण भूकंपाच्या दृष्टीने 2.5 ची तीव्रता फारशी मानली जात नाही. मात्र हरियाणातील झज्जरमध्ये लोकांना पृथ्वी हादरल्याचा अनुभव आला. लोक घराबाहेर पडू लागले. सध्या तरी या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही.