जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जाहीर निषेध !

0

डोंबिवली, 06 जून,: धर्मवीर आनंद दिघे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाचविले अशा जितेंद्र आव्हाड यांच्या जाहीर वक्तव्याचा शिवसेनाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. त्या काळी राष्ट्रवादीचा जन्म झाला नव्हता. काँग्रेस पक्षात शरद पवार होते. जर त्यावेळी त्यांनी सोडविले असेल तर त्यांनीच मुद्दाम आत टाकले असेल अशीच दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दावणीला असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जरा कुठे मनाची नाही तर जनाची म्हणून जाहीर निषेध करायला पाहिजे. आम्हाला शिकायला येऊ नका. खासदार राजन विचारे हे आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत सहमत असतील तर तसे सांगावे असे पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगत आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

 

 

सोमवारी शिवसेना मध्यवर्ती शाखेत झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांचा सर्वांनी जाहीर निषेध केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुकाप्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रवी पाटील, संतोष चव्हाण, पंढरीनाथ पाटील, उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात सणसणीत कानाखाली खेचलेल्या घटनेच्या अपमानाचा आव्हाड यांनी बदला घेण्याचा हा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न संपले आहेत असे त्यांना वाटत आहे का ? कामाशिवाय वेगवेगळ्या प्रकारची चर्चा घडवायची. उल्हासनगरला सिंधी समाजाबाबत बोलायचे, धर्मवीर आनंद दिंघेवर बोलण्याची त्यांची लायकी नाही. शहरविकास, कामाबद्दल काही बोलत नाही. त्यांच्या या कृत्यामुळे रस्त्यवर उतरावे लागेल आणि मोठे जनांदोलन करावे लागले. राजन विचारेंचाहि आव्हाड यांना पाठींबा आहे असं असेल तर त्यांनीही तस जाहीर करावे.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मागच्या २३ तारखेलाची आनंदमठ येथे सांगितले होते की, दिघे साहेबांनी फार कष्ट घेतले. ते कोणासमोर झुकले नाहीत. पण आता आव्हाड म्हणाले कि शरद पवार याच्या समोर ते झुकले, मग तुम्ही शांत का बसले आहात, तुम्ही लाज सोडून मुस्लीमधार्जीन आहेत अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसता. विकास कामाच्या राजकारणाला विरोध करता. आम्हाला शिकायला येऊ नका.

दरम्यान तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल. शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक प्रश्न संपले आहे असे त्यांना वाटत आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा घडवायची असे काम सध्या त्यांच्याकडे राहिले आहे. धर्मवीर आनंद दिंघेबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही. आम्ही आव्हाड यांचा पत्रकार परिषदेत जाहीर निषेध करतो.

त्यावेळी शरद पवार हे कॉंग्रेसमध्ये होते. जर शरद पवारांनी सोडवीले आहे असे जर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणत असतील तर त्यांना याचा लोकांनी अडकविले असेल. कॉग्रेस फोडून राष्ट्रवादी कोणी केली ? याचे उत्तर त्यांनी द्यावे.