एनआयएने दाऊदची कुंडलीच उलगडली

0

अफाट मालमत्तेचे पुढील वारसही निश्चित

नवी दिल्ली. मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद (Most wanted underworld don Dawood ) अगदी मरणासन्न अवस्थेत असल्याच्या ऐवढेच नव्हेतर त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेकदा आल्या. मात्र, त्यात काही तत्थ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दाऊदची अख्खी कुंडलीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) उघड केली आहे. तो कराचीत (Karachi ) संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत वास्तव्यास असून शाही जीवन जगत आहे. तब्बल १२ लाख कोटींच्या अफाट संपत्तीचा तो मालक आहे. या अतिप्रचंड संपत्तीचे वारसही निश्चित केले गेले आहेत. ऐवढेच नाही तर दाऊद, त्याचा भाऊ आणि साथीदारांची पुढची पिढीसुद्धा याच धंद्यात सहभागी झाली आहे. दाऊदशी संबंधित अनेक बाबी, भानगडी एनआयएने उघडकीस आणल्या आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह अनेक देशविघातक प्रकरणांमध्ये दाऊद भारताला हवा आहे. पाकिस्तान कितीही नाकारत असला तरी तो ‘नापाक’ जागेतच दडून बसल्याचे अनेकदा समोर आले आहे. एनआयएने पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
ड्रग्जचा धंदा, स्मग्लिंग, खंडणी, धमकावणे, हवाला रॅकेट, बॉलीवुड टॉलीवूडमधील बेकायदा गुंतवणूक, बेनामी संपत्ती अशा गैरमार्गाने दाऊदने जंगम मालमत्ता जमवली आहे. दाऊदसोबतच त्याच्या भावंडांची मुले, छोटा शकीलचा मुलगा, इकबाल कासकरचा मुलगा अशी या गुंडांची पुढची पिढी देखील ‘गंदा है पर धंदा हे’ म्हणत याच व्यवसायात स्थिरावली आहे.
अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक
बेदायदेशीर मार्गाने गोळा केलेली संपत्ती डी कंपनीने कंटेनर कंपन्या, शिपिंग कंपन्या, आयात-निर्यात, खाण, विमान उद्योग, ऊर्जा, मिनरल कंपन्या, पब्लिकेशन हाऊस, रियल इस्टेट, कंत्राटी शेती, हिरे व्यापार, सोन्याचा पुरवठादार आदी क्षेत्रात गुंतवण्यात आली आहे. यातील अनेक धंदे कायदेशीर असतील आणि त्यातून मिळणारा पैसाही बेकायदा नसावा, यावर भर दिला जात आहे.
व्यावसायिक विभागणी
– दाऊदसोबत कराचीत असलेला त्याचा मुलगा मोईन अगळपगळ संपत्तीचा वारस आहे.
– दाऊदचा मुलगा मोईन, त्याचा मरण पावलेला भाऊ तुराचा मुलगा सर्फराज हे ऊर्जा, मिनरल आणि सोन्याचा धंदा सांभाळतात.
-छोटा शकीलचा मुलगा आणि भारतात वास्तव्यास असलेल्या दाऊदच्या बहिणीचा मुलगा दुबईत रिअल इस्टेटमधील कोट्यवधींची गुंतवणूक सांभाळतात.
– नुराचा दुसरा मुलगा सोहेल छोट्या शस्त्रास्त्रांचा बेकायदा धंदा करतो.
– इकबाल कासकर ठाण्याच्या तुरुंगात असून मुलगा अब्यान कायदेशीर आयात- निर्यातीचा धंदा सांभाळतो.
– दाऊदचा भाऊ मुस्तकीन याची मुलगी दुबईत एक लॉ फर्म चालवत असून हिऱ्यांचा व्यापार सांभाळते.