समुद्राच्या पोटातील थरार ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारीला पडद्यावर

0

-कलावंतांनी साधला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

नागपूर: आशयघन कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला आहे . येत्या 3 फेब्रुवारीला पडदयावर येणारा. ‘गडद अंधार’ हा मराठी चित्रपट त्या पुढचे एक पाऊल ठरणार आहे. समुद्राच्या पोटातील थरारक घटना यात आहेत. आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेलं पाण्याखालचं जग ‘गडद अंधार’मध्ये पहायला मिळणार आहे. बऱ्याच रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रीलरपट असून या चित्रपटातील कलावंत, निर्माता, दिगदर्शक यांनी नागपुरातील विविध महाविद्यालयात भेट दिली.प्रमोशनच्या दृष्टीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठीत एक अनोखं धाडस दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी केलं आहे. मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यातील गडद अंधारात बरीच रहस्ये दडलेली आहेत. पाण्याखालच्या अंधारात दडलेलं असेच एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतचं संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. यातील ‘दरिया, दरिया…’ हे गाणं सध्या गाजत आहे. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रवाहापेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.स्कुबा डायव्हिंगचा अनुभव असल्याने या कलावंतांना मालदीवसह जोखमीचे चित्रण करता आले, बारकावे टिपता आले . या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं केलं आहे. चित्रपटातील संवादही अतिशय मार्मिक असून विचार करायला लावणारे आहेत. नायिकेच्या भूमिकेत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या नेहा महाजन यात जयसोबत आहे. त दोघांची केमिस्ट्रीही रसिकांना आकर्षित करणारी ठरेल. थोडक्यात काय तर दर्जेदार निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय, मुद्देसूद लेखन, कर्णमधूर गीत-संगीत, नेत्रदीपक कॅमेरावर्क, गतीमान संकलन आणि अफलातून दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात
जय-नेहाच्या जोडीला शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, बालकलाकार अस्था आदी कलाकारही आहेत. रोहितच्या जोडीला जुईली जोगळेकर राऊत आणि दिव्य कुमार यांनीही गाणी गायली आहेत. आदिनाथ पातकर यांनी गाण्याचे संयोजन केले असून, प्रवीण वानखेडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा