इतर मागास बहुजन कल्याण ओबीसी विभागामार्फत 2018 पासून विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि इतर मागास विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता आ.प्रवीण दटके यांनी आवाज उठवला. 13 ऑक्टोबर 2022 रोजी या विषयातला शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये विधी, वाणिज्य, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचा समावेश आहे , त्यानुसारच मेडिकल विद्यार्थ्यांचाही शिष्यवृत्तीत समावेश करावा. असा सवाल देखील प्रवीण दटके यांनी उपस्थित केला . यावर उत्तर देताना अतुल सावे यांनी सकारात्मक उत्तर देत शिष्यवृत्ती धारकांची संख्या 50 वरून 500 टप्या टप्याने करू तसेच, मेडिकल विद्यार्थ्यांचाही समावेश करून जास्तीत जास्त लाभ देणार असल्याचे दटके यांना आश्वासित केले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















