कोरोना काळात आई वडील दगावले असे हजारो विद्यार्थी शासनाकडे मदतीची अपेक्षेने पाहत आहेत .सरकारने बाल न्याय निधी आणि क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून मदत देऊ केली आहे , परंतु त्याची प्रभावी अंमबजावणी होण्यासाठी आ .प्रवीण दटके यांनी विधान परिषद सभागृहात प्रश्न उपस्थित केला. नागपूर महापालिकेतील 36 असे बालके आहेत ज्यांचे आई वडील दोघेही दगावले आणि 631 असे बालके आहेत ज्यांचे आई किंवा वडील दगावले आहेत एकूण 667 बालकांना अद्याप 1 रुपयाही मिळाला नाही, तो कधी देणार ? असा प्रश्न आमदार दटके यांनी उपस्थित केला . वरील प्रश्नाला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक उत्तर देत तातडीने निधी वितरीत करू असे सभागृहाला आश्वस्त केले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















