‘माफसु’ च्या सहकार्याने ‘आरआरसी सेटअप’ ची मागणी

0

नवी दिल्ली : सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर आणि महाराष्ट्र ऍनिमल आणि फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी ह्यांच्या सहभागातून चंद्रपूरमध्ये ‘रिजनल रिसर्च सेंटर’ मंजूर करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी (Fisheries minister Sudhir Mungantiwar) केंद्रीय पशुपालन, मत्स्यपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे केली.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने नवी दिल्लीतील गरवी गुजरात येथे “सागर परिक्रमा मीटिंग” फेज-3 चे आयोजन केले होते. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री संजीव कुमार बालियान बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, राज्य सचिव व आयुक्त मत्स्यव्यवसाय अतुल पाटणे, भारत सरकारचे मत्स्यव्यवसाय सचिव जतींद्र नाथ स्वेन उपस्थित होते.


विदर्भाची मत्स्यबीज ‘क्लस्टर’ क्षमता


महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनापैकी ५०% वाटा हा विदर्भाचा आहे. गोड्या पाण्याचे साठे विदर्भात विपुल प्रमाणात असल्यामुळे हे उत्पादन सहज वाढू शकतं. ह्या रिसर्च सेंटरला मान्यता मिळाल्यास विदर्भात मत्स्यपालनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतील असे मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे .
विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी ‘क्लस्टर’ म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे त्यामुळे या मागणीचा विचार करावा अशी विनंती या निवेदनात केली आहे . केंद्रीय सागर परिक्रमा योजने अंतर्गत महाराष्ट्राला लाभलेला 720 किलो मिटरच्या सागरीभागाची (किनारा) परिक्रमा करून येथील मासेमारांशी थेट संपर्क करून समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासनही सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांना आज येथे दिले

Shankhnaad News |राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73