संत सावता माळींच्या भेटीला पांडुरंगाचे पंढरपुरातून प्रस्थान

0

 

पंढरपूर – कांदा-मुळा-भाजी अवघीं विठाई माझी, असे संतवचन सांगणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीला साक्षात श्री विठ्ठलाच्या पालखीने पंढरपुरातून प्रस्थान केले. आषाढ वद्य एकादशी निमित्त पांडुरंग हे संत सावता माळी यांच्या भेटीला जात असतात. संत सावता माळी ह्यांनी आपल्या शेतातच विठ्ठल पाहिला. त्यामुळे ते आषाढीच्या सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. यांची आठवण म्हणून आजही संत सावता माळी यांच्या भेटीला पांडुरंगाची पालखी जाते. आज सकाळी येथील, काशीकापडी समाजाच्या मठातून या पालखीचे प्रस्थान झाले. विठ्ठलाच्या पादुका सावता माळीच्या भेटीला नेण्याचा मान येथील काशीकापडी समाजाचा कळसे – गंगेकर या परिवाराला आहे. ३ दिवसांचा प्रवास करून माढा तालुक्यातील अरण याठिकाणी ही पालखी पोहोचणार आहे.