Chandrayaan-3  चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाकडे लागले समस्त भारतीयांचे लक्ष

0

ISRO श्रीहरीकोटा-तीन वर्षांपूर्वीचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यावर पुन्हा एकदा भारताचे चांद्रयान-३ हे अवकाशाकडे झेपावणार आहे. त्यासाठी इस्रोकडून पूर्ण तयारी झाली असून कालच या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन देखील सुरु झाले आहे. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले जाईल. ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करून दाखविणारा भारत हा चौथा देश असेल. त्यामुळे साऱ्या देशाच्या नजरा या प्रक्षेपणावर लागलेल्या आहेत.The attention of all Indians turned to the launch of Chandrayaan-3 

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ अंतराळ यानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही 14 दिवस चंद्रावर विविधी प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल. माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल. चांद्रयान-3 चे बजेट सुमारे 615 कोटी रुपये इतके असून ते एका हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी आहे.