Home political rahul narvekar आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नार्वेकरांना नोटीस

rahul narvekar आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नार्वेकरांना नोटीस

0

उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray  पक्षाने शिंदे गटातील 16 आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली. (Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly ) कोर्टाने नार्वेकरांना अवघ्या 2 आठवड्यांत या नोटीसीवर आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत विधानसभा अध्यक्षांना कारवाईचे अधिकार दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याने ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली होती.

या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या संदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिलाय. मुंबई-शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात यावेत, या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेलेल्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत विधानसभा अध्यक्षांना कारवाईचे अधिकार दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याने ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली आहे. (Hearing on MLA Disqualification Issue in SC) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा अध्यक्षांविरोधात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आणखी 15 आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, घटनेतील तरतुदींप्रमाणे आपण निर्णय घेणार आहोत, अशी भूमिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यासाठी योग्य तेवढा कालावधी घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.