Home political विरोधानंतरही अर्थखाते अजित पवारांकडेच राहण्याचे संकेत

विरोधानंतरही अर्थखाते अजित पवारांकडेच राहण्याचे संकेत

0

मुंबई- राष्ट्रवादीतील बंडखोर नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होऊन १२ दिवसांचा कालावधी उलटला तरी अ्दयाप त्यांना खातेवाटप झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची घडामोड पुढे आली (Ajit Pawar to be new Finance Minister) आहे. शिंदे गटाच्या विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थमंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती असून लवकच यासंदर्भात घोषणा होणार असल्याची माहिती आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते येण्याची दाट शक्यता व्यक्त होत असून छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादांकडे अर्थ खाते देण्यास विरोध केला होता. मविआत अजित पवारांनी निधीसाठी अडवणूक केल्याचा अनुभव पुढे करूनच शिंदे गटाने बंड केले होते. मात्र, आता नव्या सरकारमध्येही निधीसाठी शिंदे गटाच्या आमदारांना अजितदादांकडेच धाव घ्यावी लागणार असल्याचे दिसत असल्याने शिंदे गटाने त्यांना विरोध केला आहे. मात्र, आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने यासंदर्भात ठाम भूमिका घेतल्यावर अर्थखाते अजित पवारांकडेच सोपविले जाणार असल्याची माहिती आहे