यवतमाळ: पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाऊस येत नसल्याने आर्णी तालुक्यातील शिवर भंडारी येथील शेतकरी पुत्रांनी धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत यवतमाळ शहर गाठले. धोंड्या धोंड्या पाणी दे, गायी, वासराला चारापाणी देण्यासाठी डफडीच्या तालावर नाचत वरुणराजाला साकडे घातले.