श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा धुलीवंदन महोत्सव ७ मार्चला

0

– प्रबोधनकार श्यामसुंदर सोनर यांचे राष्ट्रीय किर्तन

नागपूर:होळी-धुलीवंदन वसंत ऋतुच्या आगमनाचा आणि कृषी संस्कृतीचे जतन करणारा सण आहे. मानवी आरोग्यावर होणारे ऋतुचे परिणाम याचा संकेत देणारा सण आहे. याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून विचार मांडले. त्यांच्या हयातीमध्ये श्रीगुरूदेव सेवाश्रम येथुन भव्य प्रभातफेरी नागपूरातील महाल-इतवारी येथील मुख्य वसत्यांनमध्ये राष्ट्रभक्तीपर गीते म्हणत प्रबोधन करायची. राष्ट्रसंतांच्या विचाराचा वसा त्यांच्या निर्वानानंतर कर्मश्री दुर्गादास रक्षक यांनी श्रीगुरूदेव सेवा मंडळ विश्वकर्मा नगर, नागपूर येथे सुरू ठेवला. हा प्रबोधनाचा वसा आजही सुरू आहे.
श्रीगुरूदेव सेवा मंडळ विश्वकर्मा नगर ज्ञानेश्वर रक्षक यांच्या निवासस्थानी 7 मार्च ला सकाळी 6 वा सामुदायीक ध्यानाने या आगळ्यावेगळ्या धुलीवंदन महोत्सवाला सुरूवात होईल. त्यानंतर एक प्रबोधन प्रभातफेरी दोन -दोनच्या रांगेत स्वच्छ कपडे परिधान करून एम्प्रेस मिल कॉलनी, स्वराज कॉलनी, विश्वकर्मा नगर येथील मुख्य मार्गावरून फिरेल. प्रभातफेरीचे समारोपानंतर युवा वारकरी, पत्रकार प्रबोधनकार श्यामसुंदर सोन्नर, बीड हे ‘संत साहित्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर किर्तन- प्रबोधन करतील. सर्वधर्म,पंथ,संप्रदायाच्या लोकांनी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रीगुरूदेव सेवा मंडळ शाखा विश्वकर्मा नगरचे संयोजक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले आहे.