नागपूर. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या नावाचा उल्लेख केला होता. महिला मंत्री करण्यासाठी अमृता वहिनींनाच सांगणार आसल्याचे ते म्हणाले होते. या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले. तुम्ही अमृताशी बोलतो असे सांगितले होते, पण त्यापूर्वी सुनेत्राताईंना विचारले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याया उत्तराने सभृहात हास्यकल्लोळ झाला.
मंगळवारी सभागृहामध्ये बोलताना अजित पवार यांनी फडणवीसांचं कौतुक करतानाच टोलेबाजीदरम्यान अमृता वाहिनी असा उल्लेख करत थेट उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा संदर्भ दिला. देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत तुमच्याकडे अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय? ते कतृत्ववान असल्याने सहा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेत. पण त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त चांगलं होणार नाही?” असा प्रश्न सरकारला विचारला. सोबतच एकाद्या महिलेकडे मंत्रीपद देण्याची विनवनी त्यांनी आपल्या खास शैलित केली होती. विदर्भ- मराठवाडा विकासासंदरभात दाखल प्रस्तावाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त उत्तर दिले. फडणवीस यांनी उत्तराला सुरूवात करताच अजितदादांपासून सुरुवात केली. विरोधकांचे प्रत्येक आरोप त्यांनी खोडून काढले.
मुख्यमंत्र्याचीही टोलेबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विदर्भातील अनुशेषाबाबत बोलताना चौफेर टोलेबाजी केली. मी एमएसआरडीसीचा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मात्र, माझ्या खात्याकडे तेव्हा काहीही काम नव्हते. तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो, की मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण माझ्याकडे सध्या काहीही काम नाही. तेव्हा त्यांनी मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. याबाबत जिंतेंद्र आव्हाडांना माहिती होते. तेव्हा ते मध्ये-मध्ये समृद्धी महामार्ग दिलाय असे बोलायचे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जिंतेंद्र आव्हाडांनी लगेच आक्षेप घेतला, मी असे कधी म्हणालोच नव्हतो, असे ते म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना, मी चांगले बोलायला गेलो तरी तुम्हाला आवडत नाही, अशी खोचक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
विधानसभेतील चर्चेत अमॄता वहिनी, सुनेत्राताई..
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा