प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरुद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले, मात्र तरी देखील हा नॉयलॉन चा मांजा सर्रास विकला जात आहे . नुकताच एका ५ वर्षीय चिमुकलीचा गळा देखील या नॉयलॉन च्या पाण्यामुळे कापला गेला होता त्यामुळे नायलॉन मांजा बाळगणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते परशु ठाकूर आणि नगरसेविका रुपाली ठाकूर यांनी आज आयुक्तांकडे निवेदन सादर करून केली , नॉयलॉन मांज्याची विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर ३०७ अन्वयर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी भाजप नेते परशु ठाकूर यांनी केली.
प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरूद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.जिल्ह्यात महानगरपालीका क्षेत्रात झोननिहाय तसेच नगरपालीका क्षेत्र व ग्रामीण भागात देखील समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी संबंधीत पोलीस ठाणेदार यांच्या समवेत नायलॉन मांजा विक्री होत असलेल्या तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरूद्ध तत्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.नायलॉन मांजाच्या वापराविरूद्ध कारवाईचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृह येथे आज बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, महानगरपातिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) रवींद्र काटोलकर, नगरपालीका प्रशासन अधिकारी अतुल पंत तसेच इरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.