बीड (Bid) – 2019 मध्ये (In ST Corporation) एसटी महामंडळात 12 विभागासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडली. परंतु केवळ ट्रॅक नादुरुस्त असल्याच्या कारणास्तव पुणे विभागातील 742 उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यात बीड जिल्ह्यातील जवळपास 90 उमेदवारांचा समावेश असून 2020 पासून हे सर्व उमेदवार शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
मागणी पूर्ण होण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan in Mumbai) देखील उपोषण करण्यात आले. परंतु अद्याप यावर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बीड मधील उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातील भोसरी (Bhosari in Pune) येथील ट्रॅकवर या उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे. परंतु हा ट्रॅक 2020 पासून नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जाते आहे. त्यामुळे या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रक्रिया रखडली आहे.