– विजय वडेट्टीवार यांचा दावा
नागपूर (Nagpur) : प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)आणि माझ्यातील वाद आता संपलेला आहे. अंतर्गत वादावर आम्ही आता पडदा टाकलेला आहे. यापुढे कुठलाही विषय शिल्लक नाही.हा वाद दिल्लीपर्यंत नेण्याचा काही विषय नाही महाराष्ट्रातच तो विषय संपलेला आहे. या विषयाला आम्ही पुर्णविराम दिलेला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. सत्तासंघर्ष निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल असा दावा केला.
आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी (Karnatak)कर्नाटकात जाऊन ढोल वाजवत होते त्यांचे ढोल वाजवून झाले असेल आणि निवडणुका संपल्या असेल तर त्यांनी आता अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, जर तुमच्या पोटाची चिंता मिटली असेल तर आता शेतकऱ्यांच्या पोटाची चिंता करा आणि शेतकऱ्याला त्वरित मदत करा. शेतकरी उध्वस्त झाला असल्याने सरकारकडे मदतीची अपेक्षा लावून बसला आहे. त्यांचं होतं नव्हतं ते सगळं गेलं प्रचंड नुकसान झाले आहे. सत्तासंघर्षाचा निकाल एक-दोन दिवसात अपेक्षित आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला गेला मात्र आता सत्ता संघर्षाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल अशीच सगळीकडे चर्चा आहे. हा निकाल नक्कीच त्यांच्या विरोधात जाणार आहे. निकाल दोन दिवसात लागल्यानंतर सत्ता संघर्षावरचा अंतिम निर्णय हाच सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे.