वर्धा (Wardha): सत्तासंघर्षाचा सुप्रिम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातील राजकीय पंडित आणि पत्रकारांनी निर्णयही देऊन टाकला अशी टीका करतानाच सत्तासंघर्षाचा योग्य निर्णय येईल अशी अपेक्षा (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा परिषद मधील स्वर्गीय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Hall) सभागृहात खरीप पूर्व आढावा बैठक घेतली. बोगस बियाणांवर कारवाई करण्यात येईल मात्र शेतकऱ्यांनी बोगस बियाणांचे बिल हे सांभाळून ठेवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.