केबीसीच्या सेट वर रंगली गुडघेदुखीवर चर्चा

0

अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan)   यांनी नागपूरच्या अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. आकाश सावजी (Orthopedic specialist Dr. Akash Savji) यांच्या कडून जाणून घेतले पीआरपी उपचार पद्धती विषयी

नागपूर (Nagpur ) : सुपरस्टार अमिताभ बच्चन     यांचा टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) सर्व परिचित आहेच. नागपूरचे डॉक्टर दाम्पत्य डॉ. आकाश आणि डॉ सोनल सावजी (Dr. Sonal Savji) केबीसीच्या सेटवर प्रेक्षक म्हणून उपस्थित असताना चक्क अमिताभ यांच्या सोबत १० मिनिटे चर्चा करण्याचा योग आला.

केबीसीचे शूटिंग झाले की अमिताभ काही प्रेक्षकांशी संवाद साधतात. डॉ. सावजी यांच्या कडे येताच सावजी यांनी अमिताभ यांना ‘ आपण हा शो आणखी २५-३० वर्ष करत राहावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर अमिताभ यांनी वयानुसार पाय आणि गुडघे आणि एकूणच तब्येत कशी साथ देईल आणि टीव्ही वाहिनीचे लोक शो कसा पुढे नेऊ पाहतात यावर सर्व अवलंबून असल्याचे सांगितले. सर्वसामान्यपणे वयाची ६० वर्ष उलटली की संधिवात, गुडघे दुखणे इत्यादी त्रास सुरु होतात. परंतु ऑपरेशन शिवाय गुडघे दीर्घकाळ उत्तम राहू शकतात असे डॉ सावजी यांनी अमिताभ यांना सांगितले.

यावर कुतुहूल म्हणून अमिताभ यांनी आणखी माहिती जाणून घेतली. प्लेटलेट रिच प्लाझ्मा अर्थात ‘पीआरपी’ थेरेपी ने शस्त्रक्रिया न करता केवळ दिवसभराच्या प्रक्रियेत गुडघ्यात फिलिंग टाकून बव्हांशी त्रास कमी केल्या जातो. गुडघा आणि शरीर एकूणच तंदुरुस्त राहिल्याने जीवनाची गुणवत्ता सुधारते असे ते म्हणाले.

या थेरेपी बद्दल जाणून घेताना बच्चन यांनी डॉ सावजी यांचे कौतुक केले. अमिताभ यांनी वाहिनीच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांना देखील चर्चेत सहभागी केले. तसेच प्रेक्षक देखील उत्सुकतेने माहिती जाणून घेत होते. डॉ सावजी यांनी अस्थिरोग विषयक आधुनिक उपचार यावर एक पुस्तक अमिताभ यांना दिले. अमिताभ बच्चन यांनी सावजी दाम्पत्याला पुस्तकावर स्वाक्षरी करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.