मुंबई,दि. ३ मे २०२३ : महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून श्री. योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. आज त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते.
नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे. एप्रिल १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली.
श्री. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.