
नवयुवक बौद्ध मंडळ, वरूर रोड यांचा सामाजिक उपक्रम
वरूर रोड (ता. राजुरा) : नवयुवक बौद्ध मंडळ, वरूर रोड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, वरूर येथील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक पुस्तके देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, बुक, पुस्तके वितरित करण्यात आली. बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी आयोजित रॅलीमुळे परिसरात सामाजिक संदेशासह जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले. रॅलीनंतर वाचनालयातील विद्यार्थ्यांना संविधान व स्पर्धा परीक्षा पुस्तके देण्यात आली.

या कार्यक्रमाला वरूर रोड येथील पोलिस पाटील बंडू भोंगळे, उपसरपंच विजया करमणकर, गौतम शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश करमणकर, प्रकाश बोरकर, लैजाबाई रामटेके, मीना घोणमोडे, ज्योती बोरकर, प्रफुल निरांजने, बालाजी करमणकर, राहुल शिंदे, शुभम रामटेके, स्वप्नील जीवतोडे, सूरज निरांजने, प्रदीप निरांजने, समीक्षा मोडक, श्रुती बोरकर, साहिल आत्राम, प्रयास धानोरकर, कुणाल भोयर, सागर बोरकर, मयूर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.



















