Home LOCAL NEWS माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

0

 

आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून ५० लाखांचा निधी मंजूर

चंद्रपूर (Chandrapur):- आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी सन २०२४–२५ अंतर्गत तसेच खनिज निधीतून साईबाबा वार्डातील गणपती ग्राऊंडवर सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या लोकहिताच्या विकास कामाचे भूमिपूजन आज सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

या सांस्कृतिक सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला यामुळे न्याय मिळणार आहे.

भूमिपूजनाचा कार्यक्रम माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता वीरेंद्र लोढीया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सिनियर सिटीझन श्री गटावरजी, श्री पुरांकरजी, श्री सदाफळ, सौ. भारत, सौ. दुधे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री संतोष आकडेजी यांनी केले. पुष्पहार श्री सागर कांत यांनी अर्पण केले.

सकाळी ९.३० वाजता थाटात भूमिपूजन संपन्न

या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष व परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. यामध्ये सौ. शितल खोडे, श्री नरेश बुटले, श्री काबळाजी, श्री काहाळे, श्री दुधलकर, सौ. राधा पल्लवी खाडे, डॉ. मते, डॉ. राम भारत, श्री मुधंदाजी, श्री राठीजी, श्री पडशीलवारजी, श्री उमाटे सर, श्री सोनडुले सर यांचा समावेश होता.

सर्व उपस्थितांनी साईबाबा वार्डातील गणपती ग्राऊंडवर सांस्कृतिक सभागृहासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक आमदार मा. श्री किशोर जोरगेवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे नागरी विकासाला चालना मिळणार असून, भविष्यात अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम येथे पार पडतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.