
भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना
दीक्षाभूमी, संविधान चौकात बाबासाहेबांचा जयघोष
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी भिक्खु संघ आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित अनुयायांनी स्तुपाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थिचे घेतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भिक्षु संघातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर स्मारक समिती तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भदंत ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, ॲड. आनंद फुलझेले, विलास गजघाटे, प्राचार्या दीपा पान्हेकर उपस्थित होते.
तत्पूर्वी ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहाराच्या प्रांगणातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर इंदोरा चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याशिवाय संविधान चौक, विमानतळ येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. भदंत ससाई यांनी चारही ठिकाणी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते नागवंश, भंते कश्यप, भंते अश्वजीत, भंते बद्धघोष, भंते धम्म्प्रकाश, भंते संघ, भंते शांतीनाग, भंते धम्मशील, भंते धम्मदीप, भिक्षुनी कुंडलिका, अनोमा, चित्ताबोधी, धम्मानंदा, सुमेधा, बोधीआर्या, सुपवासा, करुणादीप, शीलानंद, विशाखा, संघप्रिया, संघशीला, गौतमी, पुणिका यांच्यासह उपासक शैलेश सवाईथुल, नन्हा सवईथुल, अशोक गोवर्धन, आतिश शेंडे, मितेश सवाईथुल, जसवीन पाटील, अविनाश सवाईथुल, आर्यन सवाईथुल, अथर्वा सवईथुल, प्रविण रंगारी, अमोल मेश्राम, नितीन मेश्राम, गोलू मेश्राम, श्रेयस गेडाम, यांच्यासह उपासक, उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
















