
नागपूर, दि. 6 डिसेंबर 2025: महावितरणतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता अंकुर जोशी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता किशोर सुर्यवंशी, व्यवस्थापक (मानव संसाधन) अखिलेश जोशी यांच्यासह दोन्ही कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी, कर्मचारी















