Home LOCAL NEWS बहिरमबाबा नगराजवळ उघडणारे नवीन देशी दारूचे दुकान बंद करा: विवेक बोढे

बहिरमबाबा नगराजवळ उघडणारे नवीन देशी दारूचे दुकान बंद करा: विवेक बोढे

0

घुग्घुस: घुग्घुस शहरातील बहिरमबाबा नगराजवळ घुग्घुस-वणी मार्गावर हनुमान मंदिर व शिव मंदिराच्या काही अंतरावर नवीन देशी दारूचे दुकान लावण्यात येत आहे याठिकाणी दुकान लावण्यासाठी दुरुस्तीचे कामही सुरु करण्यात आले आहे.

नवीन देशी दारूचे दुकान उघडल्याने बहिरमबाबा नगर वार्डातील महिलांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व युवतींना दुकानात ये-जा करणाऱ्या मद्यपी लोकांपासून अश्लील शिवीगाळीचा धोखा निर्माण होणार तसेच छेडखानीचे प्रकार वाढणार आहे. याठिकाणी मद्य शौकीन उभे राहणार असल्याने वादविवाद आणि चोरीचे प्रमाण वाढणार. बहिरमबाबा नगर सारख्या सभ्य वसाहतीलगत नवीन देशी दारूचे दुकान उघडण्यात येत आहे. या ठिकाणी लहान शालेय मुले आपल्या आई वडिलांसह शाळेत ये-जा करण्यासाठी सकाळी व सायंकाळी उभे राहतात लहान मुलांनाही मद्यपीपासून त्रास होणार आहे.

ही समस्या लक्षात घेत नवीन उघडणाऱ्या देशी दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करून उघडण्यात येणारे नवीन देशी दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केली आहे.