Home LOCAL NEWS छोटुभाई पटेल हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

छोटुभाई पटेल हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0

चंद्रपूर :छोटुभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथे आज दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण शाळेत सामाजिक न्याय, समानता आणि बंधुता या बाबासाहेबांच्या तत्वांनी भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. त्यांच्या बहुआयामी कार्याचा, त्यांच्या सामाजिक क्रांतीचा आणि भारतीय संविधान निर्मितीतील महान योगदानाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,“शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वोच्च साधन आहे. तरुणांनी ज्ञान, विज्ञान आणि तार्किक विचारसरणीच्या बळावर स्वतःला घडवून समाजासाठी कार्य करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. सामाजिक न्याय, समता आणि बंधुभाव यांचा दीप नेहमी प्रज्वलित राहिला पाहिजे.”

यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनप्रेरणेवर आधारित घोषवाक्ये दिली, तसेच संविधानातील मूल्यांवर छोटेखानी चर्चाही घेण्यात आली.
आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जिनेशभाई  (लोटीभाई ) पटेल यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक राजीव मानकर, पर्यवेक्षक निंबाळकर सर, बारापात्रे सर, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व अनुशासनात संपन्न झाला.
chandrapur