महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी नका करू, तेलंगणा पाहा – संजय राऊत

0

 

मुंबई- चंद्रशेखर बावनकुळे यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. मुळात चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाची सी टिम आहेत. त्यांच्या हातात काही नाही. सगळं काही दिल्लीत ठरवलं जाते. के. सी. आर यांची रखवाली बावनकुळे कधी पासून करायला लागले? केसीआर यांनी तेलंगणा पहावे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता करू नये असे शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी ए, बी, सी अश्या टीम बनवून ठेवल्या आहेत. महाविकास आघाडी सगळ्या लढाईसाठी समर्थ आहे. लढाई करेल व महाविकास आघाडी जिंकेल असा दावा केला. 2019 ला एमआयएम आणि आता केसीआर भाजपची बी टीम आहे. मी दैनिक सामनामध्ये माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी इथे येण्याची गरज नाही. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही. पक्षाकडे राष्ट्रीय धोरण नाही, तुमचा तेलंगणामधील पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सुपारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्रास द्यायचा, यासाठी केसीआर यांचे प्रयोजन करण्यात आले आहे. के सी आर यांच्या राज्यात आतापर्यंत 65 सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराची सर्वात मोठी प्रकरणे आहेत. विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आणि विठोबा सगळीकडे पाहत आहेत. पांडुरंग आमचे दैवत आहेत. पांडुरंग डोळे उघडे ठेवून प्रत्येक घडामोडी कडे पाहत आहेत. तो खोक्यांकडे देखील पाहत आहे आणि तो तेलंगणाच्या बोक्यांकडे देखील पाहत आहे.