बुलढाणा – शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान करून पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. आता त्यांनी थेट राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल भाष्य केलं आहे. 15 ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा, असे सांगून त्यांनी तिरंग्याच्या हिरवा आणि पांढरा रंगावरवरही आक्षेप घेतला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्त्याव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. मात्र, संभाजी भिडे यांच्या 15 ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या वक्त्यव्याचे शिवसेनेचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी समर्थन केले आहे. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये फाळणी होऊन हिंदुस्थानमधून पाकिस्तान वेगळे करण्यात आले. 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले आणि 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, संपूर्ण हिंदुस्थानला स्वतंत्र मिळाले नाही. असे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. भारताच्या राज्यघटनेने राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. आज तो आपला राष्ट्रध्वज आहे आणि तो आपला राष्ट्रध्वज असल्याने सगळ्यांनीच त्याचा सन्मान करणे हा खऱ्या अर्थानं देशाभिमान आहे.