नाशिक -राष्ट्रवादी बैठक दिल्लीत होत आहे. मला कल्पना नाही, मला त्या कार्यकारणीचे आमंत्रण नाही. मी काही राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही.
रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले
त्याबद्दल आभारी आहे. मी त्यांना भेटणार. कोणतं पद मला भेटणार, यावर चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, मनोहर भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन अटक व्हायला हवी. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नाहीअसे त्यांनी जे म्हटलं, हे जर दुसरं कोणी म्हटलं असतं, तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहेत. महाविकास आघाडीची जुलै महिन्यात बैठक होत आहे. मला काही कल्पना नाही. पुण्यातल्या घटनेबाबत भुजबळ म्हणाले, मुलीवर अत्याचार होत आहेत हे काय चाललंय काय? सावित्री बाई, महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं.
अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे ? पोलीस आयुक्त काय करतात ?
यावर कडक कारवाई करा.अशा लोकांवर न्यायव्यवस्थेने देखील दया दाखवता कामा नये असेही भुजबळ म्हणाले.