डॉ. हेडगेवार चित्रपटाची चमू नागपूर भेटीवर

0

 

हृद्य स्वागताने कलावंत भारावले

नागपूर. बहुप्रतीक्षित डॉ. हेडगेवार चित्रपटाचे चित्रिकरण टप्प्या- टप्प्याने पुढे जात आहे. चित्रपटाच्या (Dr. Hedgewar film ) चित्रिकरणाच्या निमित्ताने संपूर्ण चमूचे नुकतेच शहरात आमगन झाले (The entire team recently gathered in the city) होते. यानिमित्त मिशन मोटिवेशन (Mission Motivation ) व भारतीय विचार मंच युवा आयामतर्फे (Bhartiya vichar Manch youva Ayam) या चित्रपटात काम करणारे सर्व कलावंत, निर्माते, दिग्दर्शक व सहदिग्दर्शकांचे समारंभपूर्वक भव्य स्वागत करण्यात आले. धरमपेठेतील नटराज आर्ट अँड कल्चर स्कूल, धरमपेठ येथे नुकताच हा हृद्य सोहळा पार पडला. या स्वागत सोहळ्याने सारेच भारावले. या चित्रपटात नागपूरसह विदर्भाच्या विविध भागातील अनेक छोट्या-मोठ्या कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाबाबत कलांवंतांसोबतच नागपूरकरांमध्येही मोठी उत्सूकता दिसून येत आहे. चित्रपटात अनेक दृष्य नागपूरशी संबंधित असणार आहेत.
सरयुपरिण ब्राह्मण संघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राम नारायण मिश्र सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आयोजकांनी निर्माते जयनंद शेट्टी, दिग्दर्शक सन्नी मंडवरा, सहदिग्दर्शक विक्की अरोरा व सहकलाकारांचे स्वागत केले. भारतीय विचार मंचचे नागपूर महानगर संयोजक सुनील किटकरू यांनी डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत डॉ. हेडगेवारांनी कोणत्या परिस्थितीत काम केले, या बाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले, लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती आहे. पण या संघटनेची स्थापना कोणी केली, हे माहिती नाही व त्याचे संस्थापक कोण आहेत हे माहिती नाही. संचालन मिशन मोटिवेशनचे कार्यवाह प्रताप काशीकर यांनी केले.