काळजी घ्या! किशोरवयीन मुलांमध्ये वाढतेय नैराश्य

0

मासिक पाळी सुरू होण्याचे वयसुद्धा घटतेय

नागपूर. कोरोनाच्या संटकाळानंतर मुलामुलींचा स्क्रीन टाईम वाढला (screen time of boys and girls increased ) आहे. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप, कंप्युटरवर तासन् तास मुले खिळली असतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे दिसून येत आहे. पौगंडावस्थेतील मुला-मुलींचे मन अभ्यासात रमत नसून आत्महत्येबाबतचे विचार मनात वाढत असल्याचे दिसते. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या प्रत्येक शंभर किशोरवयीन मुला-मुलींमागे सुमारे 10 जण नैराश्याने ग्रासलेले (Depression rise among teenagers) आढळत असल्याची पालकांची चिंता वाढविणारी माहिती प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ व अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AOP) नागपूरची उपविशेष शाखा एडोलसेंट हेल्थ अॅकेडमीच्या (Adolescent Health Academy) माजी अध्यक्षा डॉ. मंजूषा गिरी यांनी आज दिली. कोरोना आटोक्यात आल्यानंतरही स्क्रीन टाईम आणि त्यावरील चुकीच्या गेमिंग साईडमुळे किशोरवयीन मुला- मुलींमध्ये आत्महत्येबाबतचे विचार वाढत असल्याकडेही डॉ. गिरी यांनी लक्ष वेधले.
पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये कोविडनंतर स्क्रीन टाईम वाढल्याने अनेक जणांचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. अनेकांना झोप न येण्याची तक्रर जाणवते आहे. स्क्रीन टाईम वाढण्यासोबतच चुकीच्या ऑनलाइन साईड पाहण्याच्या सवयी, जंक फुड, पोर्नोग्राफीसारख्या साईडमुळे मुलींची मासिकपाळीही लवकर सुरू होत आहे. पूर्वी मासिकपाळीचे वय पंधरा वर्षाच्या आसपास होते. आता मात्र दहा ते बाराव्या वयातच मासिक पाळी सुरू होत आहे. अनेकांचे जेवनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शरिरावरही होत आहे. अनेकांना मोबाईच्या अती वापरामुळे आपल्या राहिनीमानाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
चिंताजणक परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी साधारणत: 5 ते 10 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोव्हिडमुळे मागील दोन वर्ष 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या परीक्षेला सामोरे जावे लागले नाही. परंतु, आता कोविड आटोक्यात असून, आता प्रत्यक्षरित्या 10 वी 12 वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे अभ्यासाप्रती विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे आणि परीक्षेबाबत भीती असल्याचे दिसून येत आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये रॅश ड्रायव्हींगचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज खासगी रुग्णालयांमध्ये 2 ते 3 अपघातग्रस्त पौगंडावस्थेतील मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार होत असल्याचेही दिसून येत असल्याकडेही डॉ. गिरी यांनी लक्ष वेधले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा