आत्मसमर्पणासाठी निघालेल्या आरोपीने घेतले विष

0

चंद्रपुरात खळबळ : बनावट दारू कारखाना प्रकरण


चंद्रपूर. बनावट देशी दारु कारखाना प्रकरणातील (Fake liquor factory case ) फरार आरोपी राजू मडावी (२६) रा. बाबूपेठ याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला (Accused attempted suicide by consuming poison in the office of State Excise Department). उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. कुटुंबियांनी राजू आत्मसमर्पणासाठी कार्यालयात गेल्याचा दावा करीत या प्रकरणावर शंका उपस्थित केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक टाळण्याच्या उद्देशाने आरोपीने हा बनाव केल्याचा आरोप केला आहे. तो बाहेरूनच उंदीर मारण्याचे विष प्राशन करून कार्यालयात पोहोचला होता. तपासाची दिशा भरकटविण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका शेळीपालन केंद्रावर छापा टाकून तिथे सुरू असलेला बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना समोर आणला होता. या प्रकरणात पोलिस पाटील गुरू संग्रामे आणि उमाजी झाडे या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तिघे घटनेनंतर फरार झाले होते. या तिघांचा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शोध सुरू होता. पंधरा दिवस लोटूनही हे तिघे हाती लागले नव्हते. उत्पादन शुल्क विभागाने फरार आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत करून तपास सुरू केला. फरार आरोपी राजू मडावी याच्यासह बाबुपेठ परिसरातील कार्तीक घोटेकर याचेही नाव या प्रकरणात समोर आले. वरोरा येथे चायनिजच्या दुकानात काम करणाऱ्या आरोपी राजूचा भाऊ सुरेश मडावी याला पोलिसांनी उचलून नेत बेदम मारहाण केली. तसेच, गौरव निदेकर (वय २३, रा. बाबुपेठ) यालासुद्धा पोलिसांनी तपासाच्या नावाखाली मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राजू मडावीने उत्पादन शल्क विभागाच्या कार्यालयात विष प्राषन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली.

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध

अटक अटळ असल्याचे लक्षात आल्याने राजून हे नाट्य रचल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप आहे. घटनेचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज उपलब्ध असून, या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी, तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याला कुणीही मारहाण केली नाही. तो बाहेरूनच विष घेऊन आला होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा