Chandrashekhar Bawankule भाजपकडून लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांची नियुक्ती

0

मुंबई : भाजपने लोकसभा आणि विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची (Lok Sabha and Vidhan Sabha Chief) यादी जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष (chandrashekhar bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रवीण दटके यांना तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी किशोर वानखेडे (KISHOR WANKHEDE) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

 

रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्याकडे तर चंद्रपूरची जबाबदारी प्रमोद कडू यांच्याकडे सोपविली गेली आहे.नागपुरात पूर्व नागपूरचे प्रमुख म्हणून प्रमोद पेंडके, मध्य नागपूर बंडू राऊत, पश्चिम संदीप जाधव, उत्तर नागपूरची जबाबदारी माजी आमदार गिरीश व्यास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ग्रामीणमधील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून डॉ. राजीव पोतदार यांनी नेमणूक करण्यात आली आहे. ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते तसेच मागील विधानसभेची निवडणूक त्यांनी आमदार सुनील केदार यांच्या विरोधात लढली होती. लोकसभेच्या भंडारा-गोंदियाचे प्रमुख म्हणून विजय शिवणकर, गडचिरोलीचे किसन नागदेवे, वर्धा लोकसभा मतदारसंघाची सुमित वानखेडे यांच्याकडे देण्यात आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, अमरावती लोकसभेची जबाबदारी जयंत डेहनकर यांच्याकडे, बुलढाणा विजयराज शिंदे आणि यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी नितीन भुतडा यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.