Proceedings from the Legislature on the issue of disqualification
MUMBAI मुंबई- राज्यातील सत्तासंघर्षावर विधिमंडळाकडून Legislature अपात्रतेच्या मुद्यावर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विधिमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयागाला पत्र पाठवण्यात आले असून, SHIVSENA शिवसेनेच्या घटनेच्या प्रती मागण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत गरजेनुसार, दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKNATH SHINDE आणि उद्धव ठाकरे uddhav thackeray यांना सुनावणीसाठी देखील बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे आदेश विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन्ही गटाची उलटतपासणी करुन दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. यानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष निर्णय घेतील. त्यानंतर आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनच्या घटनेच्या प्रती मागविण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिकडेच मी लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. दरम्यान, 90 दिवसांत अपात्रतेवर अध्यक्षांनी निर्णय घेतला न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय.