माजी सरपंचाकडून विवाहितेचा खून
बोलणे बंद केल्याचा राग : चाकून भोसकले

0


भंडारा. माजी सरपंच (Former Sarpanch ) गावातीलच विवाहित महिलेच्या सतत मागावर असायचा. पूर्वी ती सहजतेने त्याच्यासोबत बोलायची. पण, त्याचे मनसुबे लक्षात आल्यापासून महिलेने त्याच्यापासून लांबच राहणे सुरू केले. पण, यामुळे माजी सरपंचे मन दुखावले. वारंवार प्रयत्न करूनही महिला बोलत नसल्याने तो संतापला. तिला एकट्यात गाठले बोलत का नाही (Why don’t you talk?) असा जाब विचारला. तिने पुन्हा न बोलताच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या माजी सरपंचाने चाकुने सपासप वार करीत तिला जखमी केल आणि तिथून निघून गेल. या घटनेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Woman killed by former sarpanch). पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील मच्छेरा येथे घडली. या प्रकरणी आरोपी योगेश रामचंद्र कोकुडे (४७) याला अटक करण्यात आली आहे.
योगेश कोकुडे हा मच्छेरा गावचा माजी सरपंच आहे. तो गावातीलच ४५ वर्षीय महिलेच्या संपर्कात होता. दरम्यान, महिलेने योगेशसोबत बोलणे बंद केले. यामुळे संतापलेल्या योगेशने सदर महिलेला एकटे गाठले. माझ्यासोबत बोलत का नाही, असे विचारले. मात्र, महिलेने कारण सांगण्यास नकार दिला. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. वारंवार विनवन्या, दमदाटी करूनही ती बोलत नसल्याने आरोपी कमालीच खजील झाला. तेवढाच संतापही अनावर झाला. संतापाच्या भरातच योगेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत योगेशला अटक केली आहे. याघटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कुटुंबीय किंवा पोलिसांकडून माहिती देण्यात टाळाटाळ केली जात आहे. घटने मागील दिले जाणाऱ्या कारणावर अनेकांसाठी पचनी न पडणारे आहे. नेमके कारण अद्यपही अस्पष्ट आहे. पोलिस तपासातूनच सर्व स्पष्ट होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.