महागड्या सोन्याने बिघडविले लग्नाचे बजेट

0

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक ; प्रति तोळे 57 हजाराच्या वर भाव

नागपूर. महागाईमुळे लोक आधीच त्रस्त आहे. त्यातच आता सोने-चांदीच्या तेजीने लग्नाचेही बजेट बिघडले आहे (wedding budget is deteriorating with the boom in gold and silver). मंगळवारी सोन्याच्या दराने आजवरचा उच्चांक गाठला (Gold prices hit an all-time high on Tuesday). नागपूर शहरात (Nagpur city ) सोन्याचे दर प्रतिग्रॅम 57 हजारांच्याही वर गेला. नवीन वर्षात सोनेसुद्धा रेकॉर्ड बनविताना दिसत आहे. तर चांदा भावही प्रतिकिलो 69 च्या वर गेला आहे. नवीन वर्षाच्या पूर्वीपर्यंत सोने 53,000 ते 54,000 रुपयांच्या रेंजमध्ये सुरू होते. नवीनवर्ष लागताच 55,000 रुपयांवर पोहोचले आणि आता 57 हजारांचा टप्पा गाठला आहे. पुढच्या काळात सोन्याचा दर 60,000 रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोन्या चांदीचे वाढलेले दर बघून मध्यमवर्गीय कुटुंब डोक्यावर हात मारून घेत आहेत.

ग्राहकीवर विपरित परिणाम

लग्नाच्या सीजनमध्ये सोने-चांदीचे भाव वाढण्याचा परिणाम ग्राहकीवर होत आहे. मध्यमवर्गीय लोक कमी बजेटमध्ये हलक्या वजनाचे दागिने खरेदी करीत आहे. व्यापारी लग्नाच्या सीजनची मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करीत असतात. परंतु भाव वाढत असल्याने लोक पूर्वीच्या तुलनेत दागिन्याच्या खरेदीवर कमी पैसे खर्च करीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पूर्वी लग्नाकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जायची. हा ट्रेंड काहीसा बदलला आहे. लग्न कार्य असलेल्या घरांमध्ये शक्य तसे थोडे थोडे करून सोने खरेदी केले जाते. त्यामुळे एकदम भार येत नसल्याची ग्राहकांची भावना आहे. एकाच वेळी सोने खरेदी आता आपल्या आवक्यात नसल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होताना दिसते.

एक ग्रॅमच्या दागिन्यांना पसंती

कितीही नाही म्हटले तरी सोने ते सोनेच, त्याची सर कशालाही नाही, ही महिला वर्गाची भावना पूर्वापार राहिली आहे. पण, वाढलेले दर अनेकांसाठी न परवडणारे आहे. अशावेळी महिलावर्गाकडून सोन्याचा मुलामा असेलेले एक ग्रॅमच्या दागिन्यांना पसंती दिली जात आहे. हे दागिने घलून मिरविणाऱ्या महिलांचा वर्गही मोठा आहे. दुधाची तहाण ताकावर भागविण्यासारखाच हा प्रकार आहे.