व्हिडिओ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची फडणवीस यांची घोषणा

0

मुंबई-भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. फडणवीस यांनी या विषयावर भाष्य करताना सांगितले की, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विरोधी पक्षातील ठाकरे गटाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी कथित व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह विधान परिषदेत पटलावर ठेवला. दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.