Home Artical Blog मनपातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

मनपातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

0

गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

चंद्रपूर(Chandrapur): चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते राजेश अडूर आणि महानगरपालिका झोन क्रमांक दोनच्या नवनिर्वाचित सभापती वैशालीताई चंदनखेडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन शनिवारी (ता. २५) उत्साहात पार पडले. हा सोहळा महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
गांधी चौक येथील महानगरपालिका सभागृहात दुपारी २ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला महिला बालकल्याण सभापती संगीता भोयर, उपसभापती साहिदाबी ताजु शेख, झोन क्रमांक तीनचे सभापती रामनरेश यादव, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष नगरसेविका चंदाताई वैरागडे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, शिवा राव, माजी सभापती दिनेश चोखारे, प्रवीण पडवेकर, महेश मेंढे यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक कार्यकर्ते, एनएसयूआय काँग्रेसचे सदस्य यांच्यासह काँग्रेस व घटक पक्षांचे आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार वडेट्टीवार यांनी संघटनेची मजबुती आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक तथा गटनेते राजेश मुरली अडूर यांनी केले होते.