Home Artical Blog बुलढाणा जिल्ह्यात नागपूर नागरिक सहकारी बँकेचे यशस्वी पदार्पण

बुलढाणा जिल्ह्यात नागपूर नागरिक सहकारी बँकेचे यशस्वी पदार्पण

0

मेहकर अर्बन को ऑप. बँक चे यशस्वी विलीनीकरण

बुलढाणा(Buldhana): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दि. २४ एप्रिल २०२६, पासून आपल्या उत्कृष्ट आणि विश्वासार्ह बँकिंग सेवांसह “नागपूर नागरिक सहकारी बँकेने” यशस्वी पदार्पण केले आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा, जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवेचे नवे दालन सुरु झाले आहे.

नागपूर नागरिक सहकारी बँक व मेहकर अर्बन बँकेने सदर केलेल्या विलीनीकरण प्रस्तावास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक १६.०४.२०२६ च्या रोजी देलेल्या मान्यते नुसार दोन्ही बँकांचे विलीनीकरण होवून, नागपूर नागरिक सहकारी बँकेची मेहकर शाखा सर्व प्रकारच्या विश्वासार्ह, पारदर्शक व तत्पर बँकिंग सेवा-सुविधा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

या विलीनीकरणान्वये ग्राहकांना कोर बँकिंग सोल्युशन सहित आरटीजीएस/एनईएफटी /आयएमपीएस आणि एटीएम सेवा, मोबाईल बँकिंग सेवा, इंटरनेट बँकिंग* सुविधा सह आकर्षक व्याजदरासह मुदत ठेवी, वैयक्तिक, व्यवसायिक व गृह कर्ज सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित व आधुनिक स्वरूपात उपलब्ध होतील.

विश्वासनियतेच्या पायावर उभ्या असलेल्या नागपूर नागरिक सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ या उल्लेखनीय प्रगती साधत, बँकेच्या निव्वळ नफ्यात ८२%, तर एकूण ठेवी मध्ये २२% तर कर्ज वितरणात १८% वृद्धी नोंदवली आहे. बँकेने आर्थिक वर्षा अखेर एकूण रु. ४१५५ कोटींचा मिश्र व्यवसाय नोंदविला आहे.

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या प्रगतीचा आणि विस्ताराचा नवा टप्पा:- ग्राहकांच्या वाढत्या विश्वासामुळे नागपूर नागरिक सहकारी बँक आपल्या सेवांचा विस्तार करत सात नवीन शाखा वानाडोंगरी, बेलतरोडी, खरबी, हजारी-पहाड, जयताळा या खेरीज मंडळ (नागपूर जिल्हा) आणि आर्णी (यवतमाळ जिल्ह्स) येथे लवकरच सुरू करीत आहोत. आधुनिक सुविधा, सुरक्षित व्यवहार आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन याच्या बळावर बँक आपल्या ग्राहकापर्यंत उत्कृष्ट बँकिंग सेवा पोहोचविण्या साठी कृतसंकल्प आहे.सर्व ग्राहक हितचिंतक आणि भागधारकांनी बँकेच्या या वाढत्या ग्राहक सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, उपाध्यक्ष अशोक गोयल आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे.