
छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar : निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. (Agriculture Minister Abdul Sattar booked in Affidavit case) सिल्लोड न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचे मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले. दरम्यान, सत्तार यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांची आमदारकी जाणार असून ते सहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरू शकतात.False information in affidavit, case against Agriculture Minister Sattar
सत्तार यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली व डॉ.अभिषेक हरिदास यांनी २०२१ मध्येच याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने शंकरपल्ली यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तिसऱ्यांदा न्यायालयाने मुद्देनिहाय तपासाचे आदेश दिले व सत्तार यांचा जबाबही नोंदवला. न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे सत्तार यांच्या मालमत्तेशी संबंधित माहितीसह शैक्षणिक माहितीतही तफावत आहे. २०१४ मध्ये सत्तार यांनी १९८४ मध्ये एचएससी व बीए प्रवेश दाखविला आहे. तर २०१९ मध्ये त्यांनी १९८४ मध्ये बीएएफवाय केल्याचे दाखवले. त्यांनी त्यांच्याकडील बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्सचा तपशील दिलेला नाही. प्रलंबित खटल्यांंची माहितीही दिलेली नाही.