– चूगल्या का करतो याचा जाब विचारण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून संगनमताने मध्यरात्री घरावर हल्ला चढवला. त्यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुसद येथील विठाळा वार्ड येथे घडली. शहर पोलिसांनी मध्यरात्रीच खून, खूनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून तपासाला सुरुवात केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे.