इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो मेडिकल येथे परिचारक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरा – आमदार प्रवीण दटके

0

 

मेयो रुग्णालय येथे आस्थापनेवरील रिक्त 165 पदे भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे परंतु
दि.13 जानेवारी 2017 च्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन 157 पदे नवीन सर्जिकल संकुलाकरीता भरण्याचे आदेशित केले होते. परंतु त्या पदांची भरती अद्याप झाली नाही.

तसेच , नियमानुसार रुग्णालयात प्रत्येक वार्डात 2 तर ICU मध्ये 3 परिचारिका नेमण्याचा नियम आहे. परंतु , प्रत्यक्षात प्रत्येक वार्ड किंवा ICU मध्ये एकच कर्मचारी काम करत असल्याची बाब आमदार दटके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

मेयो मध्ये ५९४ बेड मंजूर आहेत , परंतु प्रत्यक्षात ८०० पेक्षा जास्त बेड सर्व्हिसमध्ये आहेत, त्यामुळे हॉस्पिटलवर याचा प्रचंड ताण आहे.

मेडिकल कॉलेज असल्यामुळे नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार २०० MBBS विद्यार्थी या क्षमतेनुसार 40 टक्के कमतरता दिसून येत आहे.

तसेच सर्जीकल साहित्य, औषधे, रुग्णाचे जेवण इत्यादी करिता बजेट मंजूर ५९४ बेड प्रमाणे प्राप्त होत असतो.

आमदार श्री दटके यांनी काही स्पेसिफिक मागण्या यावेळी केल्या.

1) नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या निर्देशानुसार कमी असणाऱ्या 40% बेड ची संख्या शासन वाढवणार का ?

2) सर्विस बेडनुसार वाढीव बेडकरिता मंजूर पदांची संख्या वाढवणार का ?

३) रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढ प्रमाणे निधी प्राप्त होणार का ?

यावेळी उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी पदभरती प्रक्रिया सुरू असून तिला गती देणार असल्याचे सांगितले तसेच नागपूर येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा करून कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

( कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात बातमी प्रसिद्ध करावी, ही विनंती)