अन्यथा मी तुमच्या घरासमोर…. नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी

0

Gang rape threat to Navneet Rana | अमरावती येथील माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नवनीत राणा यांना गँगरेपची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे म्हटले आहे

10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली

माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याच्या धमकीच पत्र स्पीड पोस्टद्वारे प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली. धमकीचं हे पत्र अमीर नावाच्या व्यक्तीनं हैदराबाद येथून पाठवलं आहे.

आमिर नावाच्या व्यक्तीचे पत्र

“तुम्ही हिंदूंबाबत अधिक बोलता हे योग्य नाही. मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर…. तुमच्यासोबत काही अनर्थ देखील मी करणार. तुमच्यावर सामूहिक अत्याचार केला जाईल,” अशी धमकी या पत्राद्वारे नवनीत राणा यांना देण्यात आली. माझे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे. तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आली. ही माहिती नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या पत्रासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे, असं विनोद गुहे यांनी सांगितलं.

पाकिस्तान जिंदाबादची घोषणा

हैदराबाद येथील अमीर नावाच्या व्यक्तीनं माजी खासदार नवनीत राणा यांना पाठवलेलं धमकीचं पत्र हे इंग्रजी भाषेतील लिपीमध्ये लिहिलं आहे. त्याचा मजकूर मात्र हिंदीमध्ये आहे. पांढऱ्या रंगाच्या कागदावर मागून पुढून हे पत्र लिहिण्यात आलं. हे पत्र ज्या पाकीटमधून पाठवण्यात आलं, त्या पाकिटावर ‘एमपी. एन रवी राणा नॉर्थ अमेरिका नवी दिल्ली’ या पत्त्यासह रवी राणा यांच्या शंकर नगर येथील घराचा पत्ता खाली बारीक अक्षरात इंग्रजीमध्ये लिहिला आहे.