Home Top News गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध, खडसेंचा गंभीर आरोप

गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध, खडसेंचा गंभीर आरोप

0

 

नागपूर : राज्याचे मंत्री
गिरीश महाजनांचे कुख्यात सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. विधानपरिषदेत फोटो दाखवत केला. महाजन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी खडसेंनी केली. सलीम कुत्ता प्रकरणात (Salim Kutta) भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले जात असताना आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. जर बडगुजर यांचे नाव घेतले जात असेल तर मग गिरीश महाजन यांचं नाव का घ्यायचं नाही? गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचें आदेश तत्काळ उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत असे आम्हाला वाटतं. सरकारने तात्काळ कारवाई करावी व महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.