EPFO Recruitment 2024 : नोकरीची सुवर्ण संधी, 65000 रुपये मिळणार पगार

0

प्रत्येकालाच सरकारी नोकर व्हावसं वाटतं. त्यासाठी अनेक तरुण-तरुणी तयारी करत असतात. सध्या ईपीएफओने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

EPFO Recruitment 2024 : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. त्यासाठी अनेकजण रोज धडपडत असतात. योग्य संधी हेरून त्यासाठी प्रयत्न केले तर सरकारी नोकर होण्याची संधी मिळू शकते. अशीच संधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात ईपीएफओने (EPFO) उपलब्ध करून दिली आहे. ईपीएफओकडून भरती होत असलेल्या पदांसाठी तुम्ही इच्छुक असाल तर लगेच त्यासाठी अर्ज करा. ईपीएफओच्या epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्याआधी या भरती प्रक्रियेसाठी नेमकी कोणती प्रक्रिया आहे? भरतीसाठीच्या नेमक्या अटी काय आहेत? हे जाणून घ्या…

ईपीएफओकडून यंग प्रोफेशनलच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी ही पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर असणार आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेचा विचार न करता लवकरात लवकर त्यासाठी अर्ज करायला हवा.

ईपीएफओसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट काय?

ईपीओफओसाठीच्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 32 वर्षे असावे. त्यापेक्षा अधिक वय असणारी व्यक्ती या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही.

ईपीएफओच्या भरतीसाठी शिक्षणाची अट काय?

ईपीएफओकडून आयोजित केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे.

निवड झाल्यानंतर पगार किती मिळणार?

ईपीएफओच्या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड झाल्यास 65 हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे पगार दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला दिलिलीत नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

ईपीएफओमधील पदभरतीसाठी अगोदर मुलाखत होईल. मुलाखतीदरम्यान उमेदवाराला स्व-साक्षांकित तसेच मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.

EPFO Recruitment 2024 ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

EPFO Recruitment 2024 नोटिफिकेशन 

 

Previous article‘या’ दोन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Next articleअष्टगुणी ‘कमल’ मध्ये भरले नृत्यनाटिकेतून रंग
Priyanka Thakare
प्रियंका ठाकरे, ही शंखनाद न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे. २०२३ पासून ती पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मासकम्युनिकेशनमध्ये एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. फिल्ड रिपोर्टींग, विविध विषयावर तज्ज्ञाच्या मुलाखती घेतल्या आहेत. Shanknaad is a multilingual news channel available in Hindi, Marathi, and English. It covers news from across the country, including Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh, Chhattisgarh, Delhi, and Mumbai. The channel focuses on a variety of topics such as politics, social causes, sports, employment, religion, lifestyle, business, and food. With the growing consumption of digital media and the majority of the global population active on social media platforms like Facebook, Twitter, Instagram, and YouTube, Shanknaad is also accessible to its users on these platforms.