मुंबई: पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगा दाखल झाल्या आहेत. पावसाचा सिजन सुरु झाला कि भुईमूंग खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु होते. यंदा देखील बाजारात विक्रीसाठी भुईमूंग उपलब्ध आहे, किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपयांनी विकला जातो, जेव्हा आवक कमी होते तेव्हा भाव वाढ होते तर आवक वाढल्यावर भाव कमी होतात, सध्या सीजन सुरु झाल्याने भुईमूंग शेंगा खरेदीसाठी ग्राहकांची देखील गर्दी आहे. पुढील काही दिवस विशेषतः महिनाभर भाववाढ होऊ शकते असे व्यावसायिकानी सांगितले.