Nagpur उद्धव ठाकरे विरोधात भाजपचे आंदोलन,भाजयुमोने जाळला पुतळा

0

 

नागपूर Nagpur – सोमवारी Uddhav Thackeray’s offensive criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Vasantrao Deshpande Hall वसंतराव देशपांडे सभागृहात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसत आहे. भाजयुमोतर्फे काल रात्री वर्धा रोडवर उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फडण्यात आले तर कार्यकर्त्यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी,प्रसाद मुजुमदार आणि इतरांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, पुतळा जाळण्यात आला. दरम्यान, व्हेरायटी चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत उद्धव ठाकरेंविराधात जोरदार घोषणाबाजीसह शहर अध्यक्ष आ प्रविण दटके यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त केला. यावेळी स्थानिक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मिथ्या संख्येत उपस्थित होते. एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या विदर्भातील दौऱ्यानंतर भाजप नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते ठाकरेंच्या विरोधात नागपूरसह ठिकठिकाणी आक्रमक होताना पहायला मिळत आहे.