ग्राहकांची नवलाईला पसंती
(Wardha)वर्धा : भुईमुगाच्या शेंगा म्हटलं की नवलच, याच भुईमुगाच्या शेंगा आता बाजारात विक्रीस दाखल झाल्या असल्याने ग्राहक घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर या भुईमुगाच्या शेंगा विक्रीस आहेत. शंभर रुपयाला सव्वा किलो विकत असल्याने नागरिकही नवलाई म्हणून त्या घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. पावसाळा लागल्यावर ही मागणी अजूनही वाढत असल्याने जो माल बाहेर ठिकाणावरून खरेदी करून आणतो त्याचे पैसे सुद्धा निघत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितले.